Friday, August 21, 2015

उद्या पुन्हा सोमवार ???

दुपारच्या असह्य उकाड्यामुळे जरा विसावा मिळावा म्हणून सुर्य मावळल्यावर अंगणात नेहमी प्रमाणे फेऱ्या चालू होत्यारविवारच्या हक्काच्या सुट्टीची संध्याकाळ होतीशनिवारच्या आरमामुळे मन तसं तणावमुक्तच होतंसंध्याकाळची वाऱ्याची झुळूक मनाला उत्साहाची फुंकर घालत होती आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळताना निसर्गाच्या किमायांची उजळणी चालू होतीमन तसं स्तब्धच होतंपण मनच ते कुठून त्यात एक विचार डोकावला “उद्या पुन्हा सोमवार पुन्हा ऑफिस दगदग आणि वैताग ”मनस्थितीचा स्तर एकदम उच्चकोटीत असल्यामुळे ह्या नकारात्मक विचाराला तो लगबगीने मागे सारत होताआणि "या विचाराने मनात का यावं?” याची विचारचक्र गतिमान व्हायला भाग पाडत होता.

बऱ्याचवेळा आपल्या सर्वांच्या मनात प्रत्येक रविवारी हा प्रश्न येतो आणि आपण कधी या प्रश्नाने अस्वस्थ होतो किवा अंगवळणी पडलेल्या रिती प्रमाणे पुढच्या दिवसासाठी तयार होतोखरतर हा प्रश्न फक्त काही समुदायाचा किवा विशिष्ठ प्रकारच्या व्यक्तींचा नाही तर जवळपास ८०लोकांना हा प्रश्न रविवारी अस्वस्थ करतोच आणि व्हाटसप्प फेसबुक वरून फिरणाऱ्या ततसंबंधीच्या मेसेजेसनी अजून वाढवतो मी हि त्यातलाच काही वेगळा नाही पण या जखमेवरची दुख संपावी म्हणून मानाने घेतलेला हा शोध .

या सर्व अस्वस्थतेचं कारण शोधायला गेलं तर बरेच लोक म्हणतात कि "हि वृत्ती आहे लोकांची", पण हि वृत्ती नसून 'प्रवृत्तीआहे असं माझं ठाम मत आहेयाचा मागोवा घेताना एक गोष्ट लक्षात येते कि बव्हंशी आपण आपापल्या नोकरी व्यवसायावर मनापासून प्रेम करत नाही आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपलं उपजीविकेच साधन हे एकतर परिस्तिथीमुळे जगाच्या वाढत्या ओघामुळे किवा पारंपारिकरित्या लादलेगेल्यामुळे मिळालेलं असतं किवा आपण निवडतो .मनापासून ठरवून निवडलेल्या किवा मिळालेल्या कामाचा कंटाळा येण्याचं काही प्रश्नच नसतो कारण ते काम म्हणजे आनंद असतो आणि आनंदाचा कोणालाच कंटाळा येत नाही किवा तो अस्वस्थहि करत नाही .

यातच मानवी प्रवृत्ती दडलेली आहेमनुष्य हा भावनाप्रधान प्राणी असून त्याला मनाविरुद्ध काम करायला आवडत नाहीहि प्रवृत्ती या अस्वस्थतेचं मूळ कारण आहे उदाहरण दाखल द्यायचं झालं तर नाटककार कलाकार गीतकार वगरे यांना कधीच आपल्या कामाचा कंटाळा येत नाही त्यांच्यात तो उत्स्फूर्त उत्साह आपोआप येत असतोन दमता न कंटाळता त्यांच्यात जणू एक विलक्षण उत्साह असतो जणू एक अमर उत्साहाचा झराच असतो.

प्रत्येकामध्ये हा झरा असतोच कारण आपली उत्पत्तीच एक सर्वशक्तिमान प्रेरणेच्या उत्साहाच्या स्रोताचा भाग आहे जीवनात आपण अनेक वळणाना सामोरे जात असतोआपल्या जीवनातल्या काही वळणावर आपण एकदा निर्णय घेतला कि काहीवेळा तो आपण परत बदलू शकत नसतो किवा तशी संधीहि मिळत नाहीतसेच काही नशीबवान वगळता बऱ्याचवेळा आपलं काम व्यवसाय बदलण्याची संधी कमी होते किवा आपण ते बदलू शकत नसतो पण या गोष्टीत खितपत पडण्यापेक्षा मार्ग शोधण फार महत्वपूर्ण आहे हा उत्साहाचा झरा अटण्याचा किवा त्याचा प्रवाह कमी होण्याच्या मागे कारण बरीच आहेत वर म्हटल्याप्रमाणे मानाविरुद्धचा प्रवास हे मूळ असून अट्टाहास जाच आणि विसंगत जीवनशैली या गोष्टीहि त्याला कारणीभूत आहे हा प्रत्येक मुद्दा आपण आता सविस्तर पाहू .

सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपण स्वतःला कामात एवढं झोकून देतो कि आपल्याला आपलं शरीरभावना आणि परिवार यांचं काहीच भान राहत नाही आपण एका अनाहूत हव्यासापोटी आशाळभूत माणसाप्रमाणे त्यामागे नुसते पळत असतो आपण सुंदर भाषेत याला "यशस्वी होण्यासाठीचे प्रयत्नम्हणतो या प्रयत्नांच वेड एवढं आहे कि आपण हे प्रयत्न खाजगी जीवनात आणतो आणि मग घरहि ऑफिस होऊन जातंआपल्या पैकी काहींना यश मिळतंकाहींना मिळत नाही .मिळालेल्याला वाटत कि यश किती कठीण आहे आणि न मिळालेल्या पराभवाची मानसिकतादोघेही तसे काही सुखी नाहीतच या सर्वात मनाला समजावण्याची आवश्यकता हि आहे किआपल्या स्पर्धात्मक युगात संधी या मर्यादित असून स्पर्धक जास्त आहेत त्यामुळे खचून जाऊ नये आणि प्रयत्नही सोडू नयेत आपल ध्येय आणि जीवन यात समतोल राखणं हा यावरचा मुख्य मार्ग आहे आणि हा समतोल जर साधायचा असेल तर उत्तम उपाय म्हणजे आपल्या जवळच्या लोकांशी मनमोकळे पणाने प्रत्यक्ष व्हाटसप्प फेसबुक नाही संवाद साधा आपला रोडावलेला प्रत्यक्ष संवाद हे या रोडावलेल्या झर्याला पुन्हा नवजीवन देऊ शकतात.

आता बोलूया ते काही नशीबवानज्यांना आपलं काम आपल्या निवडीतून मिळालाय त्यांच्याबद्दलयापैकीही बरेच लोक वरील सर्व प्रश्न अनुभवतात त्यांचं कारण बहुदा लपलेलं असतं ते आवडत्या कामाचा जाच जाच निर्माण होण्याची बरीच कारण आहेत जस की स्पर्धा कार्यालयीन राजकारण क्षमतेपलीकडचे श्रम ,वरिष्ठांचा धाक कार्यालयीन वातावरण आणि पद्धती इतर या सर्व गोष्टी आवडीच्या कामालाही मारक ठरतात यासर्व गोष्टीमुळे आपल्या कामाच्या कल्पकतेवर आणि दर्जावर परिणाम होतो आणि आवडीचं कामही मनाला आनंद देऊन जात नाही याबद्दलची एक म्हण कॉर्पोरेट विश्वात फार प्रसिद्ध आहे “Explicit factors kills skills and quality”. जाचातून बाहेर पडण्याच्या मुख्य मार्ग म्हणजे 'प्रतिकार क्षमता निर्माण करणं आणि क्षमतावर्धन' -- be fittest or protest for best. हा उपाय तसा सोप्पा नाही पण दुसरं औषध हि नाही .

तिसरा मुद्दा म्हणजे विसंगत जीवनशैली आपल्या बऱ्याच जणांचं काम आणि जीवनशैली यात फार विसंगती आहे वाढत्या शहरीकरण अर्थकारण ,औद्योगीकरण आणि ह्रास पावणारी निसर्ग प्रणाली याकडे जर बारीकपणे पाहिलं तर स्पष्टपणे लक्षात येत कि या सर्वागोष्टींनी आपल्या जीवनशैलीला मूळ स्वरूपाशी विसंगत होण्याला भाग पडलय वाढत्या शहरीकरणामुळे शहराबाहेर फेकली गेलेली कार्यालयेअपंग झालेली दळणवळण व्यवस्था वाढलेला प्रवास ,अर्थकारणाचा मेळ घालण्यासाठी कमी केलेला मोबदला वाढत प्रदूषण वाढलेली दगदग खलवलेल शरीरामान आणि निसर्गाचा ह्रास या सर्व आव्हाहनांना आपण नकळतपणे समोर जात असतो आणि त्याचा आपल्या मनावर मानसिकतेवर होणारा परिणाम आपल्याला मनाला सुन्न करत असतो याकडे आपलं जराही लक्ष नसतंया जीवनशैलीतून नकळत येणारी निराशा आपल्यातल्या उत्साहाला गोठवत असते दर आठवड्याला पाच ते सहा दिवस या सगळ्या दिव्याला झेलून आपण आठवड्याच्या सुट्टीच विभाजन परिवारआरामआठवड्याची कामे किवा परत सुट्टीच्या दिवशीचे काम या हिंदोळ्यात झुलवत असतो आणि त्यात दोन दिवसांची सुट्टीहि आपल्याला अपुरी पडते .

वरील चारही गोष्टींचा आढावा घेताना आपल्या हे लक्षात येतं किया सर्व आव्हाहनांना आपण सामोरे जाऊन आपण आपण उरतो का आपण खरच जगतो का ?आपण आपला उत्साह पुनरुजीवीत करतो का ?.

आजचे आपण म्हणजे परिस्थितीच्या आव्हानांच्या खडकात निपचित पडलेल्या झऱ्यासारखे झालो आहोत तो पुन्हा पुन्हा नवनिर्माणाची हाक मारतोयपण आपण सुन्न झालो आहोत उत्साहाच्या या झारयाला जर पुनर्रुज्जीवीत करायचं असेल तर मन सशक्तीकरण आणि मनाला समाधानी बनवणं याला दुसरा राजमार्ग नाही या राजमार्गावरून चालण आपल्याच हाती आहे कारण यावरून जाणाऱ्या गाडीचे चालक आपणच आहोत आणि प्रत्येकाचा प्रवासही वेगळा आहे .कोणत्या उत्साहाच्या पेट्रोलपंपावर थांबून उत्साहाची टाकी फुल्ल करायची आणि कोणत्या निवारयावर भाकरी साठी थांबायचं हे प्रत्येकाने ठरवायला हवंनहितर आपल्या आयुष्याची गाडी कुठल्या जंगलात जाऊन थाबेल आणि वाटच नसेल किवा नजर हटी दुर्घटना घटी होईल हे सांगताच येणार नाहीआपण सर्वांनी या उत्साहाच्या झऱ्या भोवतालच्या अडथळ्यांना दूर करून त्याला राजमार्ग खुला करून देण्याची नितांत गरज आहे.

सर्वांना पुढील सर्व उत्साहपूर्वक सोमवारच्या शुभेच्छा !!!

धन्यवाद !

***** अनमोल